सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा २००३ कलम ४ व २१ प्रमाणे बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रावर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोरेगाव पार्क परिसरात सिद्धार्थचे रेस्टॉरंट आहे. याच्या बाहेर हुक्का उपलब्ध करुन देत असल्याचा सिद्धार्थवर आरोप आहे.