पेट्रोल 31 तर डिझेल 71 पैशांनी स्वस्त

बुधवार, 1 जुलै 2015 (09:35 IST)
मुंबई- महागाईची झळ सोसणार्‍या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. पेट्रोलचे दर प्रतिलीटर 31 पैसे तर डिझेल प्रतिलीटर 71 पैशांनी स्वस्त झाले आहे.
 
पंधराच दिवसांपूर्वी पेट्रोलच्या दरात 64 पैशांनी वाढ झाली होती. मात्र पुन्हा दर 31 पैशांनी घटल्यामुळे कारमालकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. डिझेलचे दर 15 दिवसांपूर्वी 1 रुपया 35 पैशांनी कमी झाले होते.
 
सरकारने मागील ऑक्टोबरमध्ये पेट्रोल आणि डिझेलला नियंत्रणमुक्त केले होते. त्यामुळेच पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल केले जातात.

वेबदुनिया वर वाचा