परप्रांतीयांमुळे दिल्लीत गुन्हे वाढले - ‍दीक्षित

वेबदुनिया

सोमवार, 23 जानेवारी 2012 (12:49 IST)
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत मोठ्या प्रमाणात परप्रांतीय आल्यानेच शहरातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाली अस्लाचा दावा दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी आज केला.

दिल्लीत रस्ते, पथदिवे तसेच सार्वजनिक वाहतुकीच्या अपुर्‍या सोईंमुळे दिल्लीत महिलांवरील अत्याचार, छेडखानी, बलात्कार वाढल्याचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. या संदर्भात विचारले असता दीक्षित यांनी अहवालाचे निष्कर्ष फेटाळले. परप्रांतीयच यासाठी जबाबदार असल्याचे त्या म्हणाल्या.

वेबदुनिया वर वाचा