परदेशात जाऊ शकते मॅगी

बुधवार, 1 जुलै 2015 (11:00 IST)
भारतात बंदी असलेली मॅगी मानवी सेवनासाठी योग्य असल्याबाबत कंपनीची खात्री असेल कंपनी त्याची निर्यात करू शकते, असे मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले.

नेस्ले कंपनीच्या नऊ प्रकारच्या मॅगी नूडल्सवर भारतीय अन्न सुरक्षा आणि दर्जा मानक प्राधिकरणाने बंदी घातली आहे. याविरुद्ध कंपनीने याचिका दाखल केली होती. यावर भारतात जरी बंदी असली तरी मॅगी मानवी सेवनासाठी योग्य असल्याबाबत कंपनीची खात्री असेल कंपनी त्याची निर्यात करू शकते, असे मुंबई उच्च न्यायालयाने  स्पष्ट केले आहे.

वेबदुनिया वर वाचा