पंतप्रधान मोदी यांनी वॉर रूममध्ये घालवले दोन तास!

गुरूवार, 22 सप्टेंबर 2016 (12:53 IST)
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये उपस्थित दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. असे म्हटले जात आहे की उरी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉर रूममध्ये दोन तास घालवले होते. या दरम्यान त्यांनी सेनेसोबत पुढील धोरणांवर देखील चर्चा केली.   
  
वृत्त चॅनल एबीपी न्यूज ने दिलेल्या वृत्तानुसार हा वॉर रूम साऊथ ब्लॉकमध्ये पंतप्रधान कार्यालयाच्या जवळच स्थित आहे आणि पीएम मोदी यांनी उरी हल्ल्यानंतर 20 सप्टेंबरला या रूममध्ये दोन तास घालवले होते. त्यांच्यासोबत एनएसए अजीत डोभाल, सेना प्रमुख दलबीर सुहाग, वायुसेना प्रमुख अरुण राहा, नौसेना प्रमुख सुनील लांबा देखील उपस्थित होते.  
 
वॉर रूम ती जागा असते जेथे सेनेच्या सुरक्षेशी निगडित प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्याशिवाय युद्धाच्या स्थितीत हीच जागा कंट्रोल रूम प्रमाणे काम करते. जेव्हा पीएम मोदी सेना प्रमुख आणि एनएसएसोबत येथे होते तेव्हा त्यांना पावर पॉइंट प्रेझेंटेशन आणि टेबलावर पाकमध्ये दहशतवादी ठिकाण्यांचे मॉडल बनवून सेनेच्या योजनेची माहिती देण्यात आली.  
 
असे म्हटले जात आहे की या बैठकीत मोदी यांना असे सांगण्यात आले आहे की कशा प्रकारे भारत या ठिकाण्यांना ध्वस्त करू शकतो. हे तिसर्‍यांदा आहे जेव्हा पंतप्रधान मोदी वॉर रूममध्ये गेले होते. या अगोदर दोन वेळा जेव्हा मोदी येथे आले होते तेव्हा परिस्थिती वेगळी होती. असे म्हटले जात आहे की तिन्ही सेना प्रमुखांना युद्धाबद्दल त्यांच्या रणनीतीबद्दल विचारण्यात आले आहे.  

वेबदुनिया वर वाचा