पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान दौर्याच्या पार्श्वभूमीवर जपानी भाषेतून 'ट्विट'करून जपानी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मोदींनी जपानी भाषेतून नावीन्यपूर्ण कल्पनांबद्दल जपानी नागरिकांची प्रशंसा केली आहे.अशा पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून परदेशी भाषेमधून तेथील नागरिकांशी संवाद साधणारे मोदी भारतातील पहिले पंतप्रधान ठरले आहेत. मोदी यांनी आपल्या वैयक्तिक ट्विटर अकाऊंटवरून आणि पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून जपानी भाषेतून ट्विट केल्याचे सूत्रांनी सांगितले.