नारायण साइंची सहयोगी धर्मिष्ठा अटकेत

WD
लैंगिक अत्याचार प्रकरणी फरार असणा-या नारायण साईच्या अत्यंत निकटवर्तीय गंगा ऊर्फ धर्मिष्ठा बेन पटेल हिला शुक्रवारी सकाळी सूरत पोलिसांनी अटक केली. तिच्या अटकेमुळे आता नारायण सार्इंच्या अडचणीत आणखी भर पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.तिच्यावर पीडितेला धमकाविण्याचा आरोप लावण्यात आला होता.

सूरतमध्ये नारायण साईविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत महिलांनी गंगा नारायण साईला मुली पुरवित असल्याचे सांगितले होते. त्यामुळे गंगाचा सूरत पोलिस अनेक दिवसांपासून शोध घेत होते. उदयपूरच्या रामागाव येथून गंगाला अटक करण्यात आली आहे. आसाराम आणि नारायण साई यांचे भक्त असणा-यांकडे गंगाने आश्रय घेतला होता. तसेच गंगाचा या पापात साथीदार असणारा तिचा पती प्रशांत मिश्रा यालादेखील चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, अजूनही पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यात नारायण साई यशस्वी झाला आहे. त्याच्या शोधासाठी दिल्ली, गाझियाबाद, आग्रासमवेत अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

कोण आहे धर्मिष्ठा ?
मूळची गुजरातमधील बडोदरास्थित भायली गावात राहणारी गंगा ऊर्फ धर्मिष्ठा नारायण साई आणि आसारामच्या आश्रमाची संचालिका होती. मात्र येथील आश्रमात काही विवादास्पद घटनांमध्ये तिचे नाव आल्याने तिला साबरकांठा येथील गम्बोईच्या आश्रमात पाठविण्यात आले होते. दरम्यान, ती नारायण साई आणि आसारामला मुली पुरविण्याचे काम करत असल्याचे सर्वांच्या निर्दशनात आले होते.

वेबदुनिया वर वाचा