नागालँडमध्ये आठ जवान शहीद

सोमवार, 4 मे 2015 (11:38 IST)
माओवाद्यांनी केलेल्या हल्यामध्ये आसाम रायफल्सचे आठ जवान शहीद तर सहाजण जखमी झाले आहेत. जवान ज्या ठिकाणी गस्तीवर होते, तेथे पाळत ठेऊन माओवाद्यांनी स्फोट घडवून आणले.

नागालँडच्या मोन जिल्ह्यातील चांगलांग सू भागामध्ये हे स्फोट घडले. प्रत्युत्तरदाखल जवांनानी केलेल्या गोळीबारात एका माओवादी ठार झाल्याचे वृत्त आहे.

वेबदुनिया वर वाचा