दोन वेण्यांचा आग्रह करू नका : बालहक्क आयोग

मंगळवार, 23 ऑगस्ट 2016 (11:02 IST)
शाळांनी दोन वेण्यांचा आग्रह करू नये, असा आदेश राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने जारी करावा, असे निर्देश बालहक्क आयोगाने दिले. मुलींनी शाळेत येताना दोन वेण्या घालूनच आले पाहिजे, अशी सक्ती करणे हे विद्यार्थिनींच्या बालहक्कांचे उल्लंघन आहे, असा निकाल केरळ राज्य बालहक्क आयोगाने दिला आहे.

केरळमधील मुली आठवड्यातून एकदा नव्हे तर दररोज केसावरून आंघोळ करतात, या पार्श्वभूमीवर विद्यार्थिनीने आयोगाकडे तक्रार केली होती. सकाळी शाळेत येण्याच्या घाईच्या वेळी केस नीट न वाळवता त्यांच्या घट्ट वेण्या बांधल्या तर केसांना कुबट वास येतो. शिवाय केसांत कोंडा होतो व खाज सुटून डोक्यावर चट्टे उठतात. यावर उपाय म्हणून अनेक मुली आंघोळ न करताच शाळेत येतात, असे तिचे म्हणणे होते. आयोगाने म्हटले की, शाळांनी दोन वेण्यांचा आग्रह धरणे हे विद्यार्थिनींच्या शारीरिक आणि मानसिक तणावात भर टाकणारे असल्याने हे त्यांच्या बालहक्कांचे उल्लंघन आहे.

वेबदुनिया वर वाचा