देशविरोधी घोषणा दिलने कन्हैय्या कुमारला अटक

शनिवार, 13 फेब्रुवारी 2016 (10:50 IST)
अफजल गुरूला शहीद म्हटलने आणि देशविरोधात घोषणाबाजीचा वाद पेटला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार याला पोलिसांनी चौकशीनंतर अटक केली. तर दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक अली जावेद यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे. 
 
प्रेस क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात भारतविरोधी नारेबाजी करण्यात आली. यावेळी प्राध्यापक जावेदही प्रेस क्लबमध्ये उपस्थित होते.
 
प्रेस क्लबमधील घटनेनंतर प्राध्यापक जावेद अली यांची क्लबची सदस्यता रद्द करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी हॉलच्या बुकिंगबाबत क्लबला अंधारात ठेवण्यात आले. अशा घटनांचा घोर निषेध करतो, असे प्रेस क्लबने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
 
दहशतवादी अफजल गुरू आणि जेकेएलफचा संस्थापक मकबूल भट यांच्या फाशीवरून 9 फेब्रुवारीला विरोध केला गेला होता. या विरोधासाठी आयोजित कार्यक्रमात भारतविरोधी नारे देण्यात आले होते. या कार्यक्रमाचा आयोजक मी होतो आणि तिथे उपस्थित होतो, पान 5 वर असे घटनेवरून वाद उफाळून आल्यानंतर जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारने सांगितले. विद्यापीठाने या कार्यक्रमासाठी परवानगी नाकारली होती. पण 9 फेब्रुवारीच्या रात्री विद्यार्थ्यांनी कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात ‘पाकिस्तान झिंदाबाद, भारत की बर्बादी तक जंग जारी रखेंगे आणि काश्मीर को आझाद करेंगे’, अशी भारतविरोधी नारेबाजी करण्यात आली.
 
‘फुटीरतावादी नेता एसएआर गिलानीने आपली दिशाभूल केली. काश्मीर विषयावर चर्चासत्र घेण्यासाठी हॉल बुक करायला सांगितला. पण तिथे घडले वेगळेच. आलेल्या विद्यार्थ्यांनी अफजल गुरूला शहीद ठरवले. तसेच भारताविरोधी नारेबाजी केली. गिलानीला हे माहीत होते पण त्याने हे रोखले नाही. त्याने आमची दिशाभूल केली’, असा दावा प्राध्यापक जावेद अली यांनी केला.
 
* दिल्ली विद्यापीठातील माजी वखता एस. ए. गिलानी याच्यावर राजद्रोहाचा गुन्हा
 
* जेएनूच विद्यार्थना घाबरवण्याचा प्रयत्न
- भाकप नेते डी. राजा
 
* इंडिया गेट येथे निदर्शने करणारे अभाविपचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात   
 
* हुरियत नेता गिलानी यांनी दिशाभूल केली. गोंधळाशी संबंध नाही
- प्राधपक, अली जावेद
 
* जेएनूतील घटनेची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करणार
- कुलगुरू
 
* देशाच्या विरोधातील घोषणाबाजी सहन केली जाणार नाही
- किरेन रिजिजू

वेबदुनिया वर वाचा