दिल्लीत संततधार सुरू राहणार!

गुरूवार, 1 सप्टेंबर 2016 (10:31 IST)
दिल्ली : राजधानी दिल्लीबरोबरच गुरगाव, नोएडा आणि हैदराबाद शहरात झालेल्या संततधार पावसामुळे पाणी भरले. या पाण्यामुळे जनजीवन कोलमडले.
 
वाहतुकीवरही परिणाम झाला. आणखी दोन-तीन दिवस असाच पाऊस सुरू राहण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
 
दिल्लीत पाणी साचल्याने वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला. रस्ते वाहतुकीबरोबरच ढगाळ हवामानामुळे विमान सेवेवरही विपरीत परिणाम झाल्याचे दिसून आले. 24 विमानउड्डाणे रद्द करण्यात आली. रस्ते पाण्याने तुडुंब भरले होते. रिंग रोड, भैरो रस्ता, मथुरा रस्ता, तीन मूर्ती, गोल चक्कर, इग्नू रस्ता, आश्रम चौक, महाराणी बाग, लाजपतनगर, राजा गार्डन, मायापुरी आणि जिमखाना आदी भागात रस्त्यांवर पाणीच पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक कोंडीवर त्याचा विपरीत परिणाम झालेला दिसून आला. दिल्ली शहरातील निम्म्यापेक्षा अधिक भागात पाणी साचल्याने जनजीवन कोलमडले. तसेच शाळकरी विद्यार्थी, नोकरदार यांनाही त्याचा फटका बसला.

वेबदुनिया वर वाचा