दिल्लीत यंदा ‘लालबागचा राजा’

गुरूवार, 28 ऑगस्ट 2014 (12:29 IST)
राजधानी नवी दिल्लीतही गणेशोत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा होत आहे. पश्चिम भारतात गणेशोत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा करण्याची परंपरा असली तरी नवी दिल्लीतही गणेशोत्सवाला उत्सवी स्वरूप प्राप्त होत आहे.
 
पितमपुरा भागात यंदा लालबागच्या राजाची प्रतिकृती मुंबईतूनच येणार आहे. गणपतीची मूर्ती मुंबईतील मूर्तीएवढीच मोठी असेल, अशी माहिती दिल्लीतील राजा लालबागचा गणपती ट्रस्टचे मेळामंत्री राजेश गुप्ता यांनी दिली.
 
उत्तमनगर, करोलबाग, राणीबाग आणि इतर ठिकाणीही यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र सदन, दिल्ली हात, लक्ष्मीनगर, गुडगाव येथेही गणेशोत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा करण्यात येतो.

वेबदुनिया वर वाचा