दिल्लीचं पाणी थांबल

सोमवार, 22 फेब्रुवारी 2016 (16:59 IST)
जाट आंदोलकांनी मुनक या तलावाला घेराव घालत पाणी थांबवण्याचा निर्धार केला आहे. काही दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा दिल्लीकरांसाठी शिल्लक आहे.
 
हरियाणातल्या मुनक या तलावातून दिल्लीला मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होतो. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी जाट आंदोलकांनी या तलावाला घेराव घातला आहे. दरम्यान सोमवारी दिल्लीतील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने यासंदर्भात बैठकही घेतली. त्यात पंतप्रधान निवास, राष्ट्रपती भवन, आर्मी कॅम्प आणि अग्निशमन दलासाठीचा पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असा निर्णय घेतला गेला. मुख्यमंत्री केजरीवालांच्या घरी आज टँकरनं पाणीपुरवठा करावा लागला.
 

वेबदुनिया वर वाचा