ताजमहालात अमेरिकेचीही सुरक्षा

गुरूवार, 22 जानेवारी 2015 (10:38 IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांच्या ताजमहाल भेटीच्या नियोजित दौर्‍यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याने या परिसरात पोलिस छावणीचे स्वरुप आले आहे. तब्बल चार हजार सुरक्षा जवानांसोबत अमेरिकेचे १०० सुरक्षा जवान याठिकाणी आहेत.
 
२५ जानेवारी रोजी भारताच्या दौºयावर येत असलेले ओबामा २७ जानेवारी रोजी सकुटुंब ताजमहाल भेट देणार आहेत. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा