तमिळींच्‍या मुद्यावर 14 द्रमुक खासदारांचे राजीनामे

भाषा

शनिवार, 18 ऑक्टोबर 2008 (12:07 IST)
श्रीलंकेत तमीळवंशाच्‍या लोकांविरोधात सुरू असलेला हिंसाचार थांबविण्‍याची मागणी करीत राज्‍यात सत्तेत असलेल्‍या द्रमुक पक्षाच्‍या 14 खासदारांनी मुख्यमंत्री एम.करुणानिधी यांच्‍याकडे राजीनामे सादर केले आहेत. राजीनामे देणा-यांमध्‍ये केंद्रीय मंत्री टी.आर. बालू आणि ए. राजा यांचाही सहभाग आहे.

यापूर्वीच शुक्रवारी सायंकाळी द्रमुकने सांगितले, होते की त्‍यांच्‍या पक्षाच्‍या चार राज्‍यसभेतील खासदारांनी करुणानिधी यांच्‍याकडे राजीनामे रवाना केले आहेत. येत्‍या 29 ऑक्‍टोबरपर्यंत श्रीलंकेतील हिंसाचार थांबला नाही तर सामुहिक राजीनामे देण्‍याची घोषणा पक्षातर्फे करण्‍यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा