डोन विमानाची निर्मिती भारतात

बुधवार, 28 जानेवारी 2015 (10:44 IST)
वैमानिकरहित डोन या लढाऊ विमानाची निर्मिती भारतात करण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी जाहीर केला आहे. पाकिस्तानातून सुरु असणार्‍या  दहशतवादी कारवायांना आणि शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांना शह देण्यासाठीच अमेरिकेने भारताला सहकार्य करण्याच्या भूमिकेतून हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. डोन या विमानांची निर्मिती भारतात झाल्यास भारतीय संरक्षण दलामध्ये आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे.
 

वेबदुनिया वर वाचा