मुंबईवरील भीषण हल्ल्याच्या कटात सहभागी असलेला आणि माफीचा साक्षीदार बनलेला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी डेव्हिड हेडली याची साक्ष घेण्यात येत आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय ही लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीनसारख्या दहशतवादी संघटनांना आर्थिक आणि लष्करी साहाय्य करीत असल्याची खळबळजनक माहिती मंगळवारच्या सुनावणीदरम्यान हेडलीने न्यायालयाला दिली असल्याने ही साक्ष महत्वपूर्ण मानली जात आहे.