'ट्विटर मिरर' या सुविधेचा वापर करणारे ते जगातील पहिले पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना मान मिळाला आहे. देशवासियांच्या संपर्कात राहण्यासाठी ट्विटरचा सर्वाधिक वापर करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80 लाख फॉलोअर्सचा महत्त्वाचा टप्पा बुधवारी पार केला. पंतप्रधानपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीत मोदींच्या फॉलोअर्सची संख्या तब्बल 40 लाखांनी वाढली आहे.