टू जी स्पेक्ट्रम घोटाळा: मारन बंधूंविरुद्ध आरोपपत्र

शनिवार, 30 ऑगस्ट 2014 (17:08 IST)
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) एअरसेल-मॅक्सिस सौद्याप्रकरणी माजी दूरसंचारमंत्री दयानिधी मारन, त्यांचे बंधू कलानिधी मारन यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. याशिवाय सहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. तसेच चार कंपन्यांचाही समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
गुन्हेगारी कट, तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष सीबीआय न्यायाधीश ओ.पी.सैनी 11सप्टेंबर रोजी आरोपपत्राचा विचार करणार आहेत.
 
दरम्यान, टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा तपास करताना सीबीआयला एअरसेल-मॅक्सिस सौद्यात गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले. त्यामुळे सीबीआयने मलेशियन व्यावसायिक टी. आनंद कृष्णन या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी राल्फ मार्शल, सन डायरेक्ट टीव्ही,मलेशियाच्या मॅक्सिस कम्युनिकेशनचा आरोपी म्हणून समावेश केला आहे.

वेबदुनिया वर वाचा