जेलमध्ये तुफान हाणामारीत दोन कैद्यांचा मृत्यू

शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2015 (10:42 IST)
तिहार जेलमध्ये कैद्यांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत दोन कैद्यांचा मृत्यू झाला. या घटनेत अनेक कैदी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.
 
तिहार जेलमध्ये कैद्यांचे दोन गट आहेत. इश्वर, विजय आणि शादब या तीन कैद्यांची आरोग्य तपासणी झाल्यानंतर ते परत जात असताना दुसर्‍या गटातील कैद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये ईश्वर आणि अनिल यांचा मृत्यू झाला. या गोंधळानंतर दोन्ही गटातील कैदी एकमेकांवर तुटून पडल्याने सुरक्षारक्षकांची धावपळ उडाली. हाणामारी सोडविताना काही कर्मचारीही जखमी झाल्याचे वृत्त आहे.

वेबदुनिया वर वाचा