जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी दोघांना सौदीत अटक

शनिवार, 10 ऑक्टोबर 2015 (10:39 IST)
जर्मन बेकरी बॉंबस्फोट प्रकरणी सौदी अरेबिया आणि दुबईमध्ये दोन भारतीयांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हैदराबादचा रहिवासी अबू सुफियान ऊर्फ असादुल्ला खान आणि झैनुल अबिदीन ऊर्फ झाहिद शेख अशी या दोघांची नावे आहेत.  लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून सुफियानला ताब्यात घेण्यात आले आहे.
 
इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेला स्फोटके पुरविल्या जाण्याच्या एका प्रकरणाचा तपास करताना गेल्या वर्षी बंगळूर पोलिसांना झैनुल अबिदीनबाबत माहिती मिळाली. जर्मन बेकरीतील स्फोटासाठी वापरलेली स्फोटके झैनुलनेच मिळविल्याचा त्याच्यावर संशय आहे. दरम्यान, या भारतीय सुरक्षा संस्था त्याला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नांत आहेत.

वेबदुनिया वर वाचा