जयललितांच्या जामिनावर आज होणार निर्णय

बुधवार, 1 ऑक्टोबर 2014 (11:08 IST)
बेहिशेबी संपत्तीप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जामीन अर्जावर कर्नाटक हायकोर्टात आज (बुधवार) सुनावणी होत आहे. विशेष कोर्टाने याप्रकरणी ठोठावलेल्या चार वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यासंबंधी ऑक्टोबरमध्ये सुनावणी होणार आहे. 
 
बेहिशेबी संपत्तीप्रकरणी बंगळुरूच्या विशेष कोर्टाने जयललिता यांना दोषी ठरवून वर्षांच्या कैदेची शिक्षा शंभर कोटी रुपये दंड ठोठावला होता. यानंतर जयललिता यांना तुरुंगात जावे लागले. जन प्रतिनिधित्व कायद्यानुसार तीन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाली, तर पदाबरोबरच संबंधित व्यक्तीची आमदार किंवा खासदारकीही रद्द होते त्याला 10 वर्षे निवडणूक लढवता येत नाही. या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरला होणाऱ्या सुनावणीकडे तामिळनाडूतील जनतेचे लक्ष लागून आहे. 
 
अण्णाद्रमुकचे राज्यसभेतील खासदार ज्येष्ठ वकील नवनीत कृष्णन यांनी सोमवारी दुपारी यासंबंधीची याचिका दाखल केली. सरकारी वकील अनुपस्थित असतानाही जामिनाचा विनंती अर्ज कोर्टात दाखल करून घेऊ शकते, असा युक्तिवाद वकिलांनी केला. दुसरीकडे, संतप्त जयललिता समर्थकांनी मंगळवारी द्रमुक प्रमुख एम. करुणानिधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. 

वेबदुनिया वर वाचा