जम्मू-कश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ल्यात एक ठार, चार जखमी

शनिवार, 26 जुलै 2014 (16:09 IST)
जम्मू-कश्मीरमधील बारामूल्ला जिल्हयातील सोपोर यथे दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात एक पोलिस कर्मचारी शहीद झाला आहे. तसेच चार जण गंभीर जखमी झाले आहेत. 
 
मिळालेल्या माहितीनुसार,मध्य रात्री अडीच वाजेच्या सुमारस दहशतवाद्यांनी सोपोरमधील मुख्य चौकाजवळ एका पोलिस  चौकीवर ग्रेनेड हल्ला केला.याच पोलिस पाच जवान जखमी झाले. परंतु त्यातील एकाचा रूग्णालयात जाण्यापूर्वीच एकाचा  मृत्यू झाला. दोन पोलिसांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना श्रीनगर येथे हलवण्यात आले आहे. 
 
गेल्या 24 तासांत दहशवाद्यांनी सुरक्षा जवानांवर दुसर्‍यांदा हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी शुक्रवारी अनंतनाग जिल्ह्यात  अंदाधुंद गोळीबार केला होता. यात एक पोलिस कर्मचारी शहीद झाला होता. 

वेबदुनिया वर वाचा