छोटा राजनला भारतात आणले

शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2015 (09:54 IST)
नवी दिल्ली: तब्बल 27 वर्षांपासून फरार मोस्ट वांटेड अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला आज सकाळी इंडोनेशियाहून भारतात आणण्यात आले.
 
छोटा राजन ऊर्फ राजेंद्र निकाळजे याला बाली येथून विशेष विमानाने दिल्ली आणण्यात आले. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या दिल्ली येथील मुख्यालयात छोटा राजनला ठेवण्यात आले असून येथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवाय मुंबई पोलिसांनी राजनच्या गुन्ह्यांचा तपासही सीबीआयकडे सोपवला आहे. भारतात छोटा राजनवर सुमारे 75 गुन्हे दाखल आहे. 
 
राजनने दावा केला होता की त्याकडे मोस्ट वांटेड आतंकी दाऊद इब्राहिमचा पत्ता आणि त्याच्या गुन्ह्यांचे साक्ष्य आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा