चुडाचंदपूर जिल्ह्यात हिंसाचारात ८ ठार

बुधवार, 2 सप्टेंबर 2015 (11:28 IST)
चुडाचंदपूर जिल्ह्यात भडकलेला हिंसाचार आणि पोलिसांच्या गोळीबारात ८ जण ठार झाले असून प्रचंड तणावामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मूळ रहिवाशांसाठीचे विधेयके विधानसभेत मंजूर झाल्यानंतर ही दंगल उसळली.

राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला आहे की, एक मंत्री, खासदार आणि पाच आमदारांच्या घरांना अज्ञात लोकांनी आग लावली. बाह्य मणिपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार थांगसो बेत, राज्याचे कुटुंबकल्याण मंत्री फुंगजांगफांग तोनसीम आणि थानलोमचे वुनगजागीन यांच्यासह पाच आमदारांची घरे जाळण्यात आली. संतप्त जमावाने चुडाचंदपूर पोलीस ठाण्यावर हल्ला केला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन जण ठार तर चार लोक जखमी झाले.

वेबदुनिया वर वाचा