चीनचे परराष्ट्रमंत्री आज भारत भेटीवर

एनएसजी देशांच्या बैठकीत चीनने भारतविरोधी नकारात्मक भूमिका घेतल्याने भारताने याविषयी नाराजी दर्शवली असून, चीनने परराष्ट्रमंत्री यांग जीएची आज भारत भेटीवर येत असून, या भेटीदरम्यान त्यांना याविषयीची माहिती देण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.


एनएसजीच्या झालेल्या बैठकीत चीनने भारत- अमेरिका कराराला आपला विरोध दर्शवल्याने चार ते पाच बैठका घेण्याची पाळी प्रथमच सदस्य देशांना आली होती.

यानंतर चीनने शेवटी हार मानत या कराराला आपली मान्यता असल्याचे जाहीर केले, परंतु चीनने भारताप्रती नकारात्मक भूमिका घेतल्याने भारत सरकारने नाराजी व्यक्त केली आहे.

वेबदुनिया वर वाचा