चार वर्षांमध्ये तीन खतरनाक दहशतवाद्यांना फाशी

गुरूवार, 30 जुलै 2015 (14:30 IST)
मुंबईतील 1993च्या साखळी बॉम्बं हल्ल्यात दोषी असलेला मृत्यू दंड भोगणारा एकमात्र दोषी याकूब मेमनला गुरुवारी पहाटे फाशी देण्यात आली असून तो मागील चार वर्षांमध्ये दहशतवादी हल्ल्यातील झालेल्या प्रकरणात तो तिसरा आरोपी बनला आहे ज्याला फाशी देण्यात आली आहे.  

याकूब मेमनला आज नागपूर केंद्रीय कारागृहात फाशी देण्यात आली ज्याचा आज  53वा वाढदिवस होता.  

फाशीची शिक्षा मिळणार्‍या अपराधीचे पक्ष देखील शेवटपर्यंत ऐकणे आणि योग्य न्याय मिळवून देण्यासाठी शीर्ष न्यायायलाचे दार अर्ध्या रात्री उघडण्यात आले आणि किमान दोन तासापर्यंत सुनवणी झाली, पण याकूबला राहत मिळाली नाही.  

सुप्रीम कोर्टाने तीन वाजता रात्री सुरू झालेली सुनावणी पाचवाजेपर्यंत चालली आणि त्यादरम्यान केंद्रीय जेलमध्ये त्याला फाशीवर लटकवण्याची प्रक्रियादेखील चालत राहिली.  
पुढील पानावर ... संसदावर हल्ल्याचा दोषी होता, मिळाली फाशी  ...
मेमनच्या अगोदर संसदावर हल्ल्याच्या आरोपात दोषी मोहम्मद अफजल गुरू याल 9 फेब्रुवारी 2013ला तिहाड जेलमध्ये सकाळी आठ वाजता फाशी देण्यात आली होती.  

अफजल गुरुला डिसेंबर 2001मध्ये संसदावर हल्ल्याचा कट रचण्याबाबत दोषी ठरवण्यात आले होते आणि उच्चतम न्यायालयाने त्याला 2004मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात ठोठावण्यात आली होती.  

भक्कम हथियाराने लेस पाच दहशतवादी 13 डिसेंबर 2001ला संसद भवन परिसरात शिरले होते आणि त्यांनी गोळीबार करून 9 लोकांचा जीव घेतला होता.  
 
दहशतवादी कसाबला शिक्षा देण्याचे कारण ... पुढील पानावर ...
अफजल गुरूच्या आधी मुंबईवर 26/11 दहशतवादी हल्ल्यात एकमात्र जीवित पकडण्यात आलेल्या पाकिस्तानी बंदूकधारी अजमल कसाबला  21 नोव्हेंबर 2012ला पुण्याच्या येरवडा केंद्रीय कारागृहात फाशी देण्यात आली होती जी एक गोपनीय अभियानाचा भाग होता.   

पाकिस्तान स्थित लश्कर ए तैयबाचे 10 दहशतवादी 26 नोव्हेंबर 2008ला मुंबई पोहोचले आणि त्यांनी शहरातील बर्‍याच महत्त्वपूर्ण जागांवर निशाना साधून अंधाधुंध गोळीबारी केला, ज्यात होटल ताज आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस सामील होते. यात काही विदेशी   लोकांसमेत 166 लोक मरण पावले होते. या दरम्यान 60 तासांपर्यंत चालणार्‍या अभियानात 9 दहशतवादी ठार झाले असून कसाबला जीवित पकडण्यात आले होते.

वेबदुनिया वर वाचा