घागराबेरा गावाजवळ सुरक्षा दलाचे जवान व पोलिसांनी संयुक्तरीत्या शोधमोहिम सुरू होती. घटनास्थळी जवान दाखल झाल्यानंतर माओवाद्यांनी गोळीबार सुरू केला होता. यावेळी जवान व माओवाद्यांमध्ये रात्रभर तब्बल 9 तास चकमक सुरू होती. आज सकाळी 4 माओवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे.