चारपटीने वाढला दिल्ली आमदारांचा पगार

शुक्रवार, 4 डिसेंबर 2015 (12:32 IST)
दिल्ली विधानसभेत आमदारांचा पगार आणि विविध भत्त्यांना वाढवण्याचे विधेयक काल दिल्ली विधासभेत मंजूर झाले आता आमदारांचा पगार 12,000 रुपए दरमाह वाढून 50,000 रुपए दरमाह होणार आहे. या विधेयकामुळे आता दिल्लीतील आमदारांना दरमहा ८८ हजारांऐवजी तब्बल दोन लाख रुपये मिळणार आहेत. तसेच आमदारांचे पेन्शन व विविध भत्त्यांमध्येही वाढ झाली आहे. 
या विधेयकामुळे दिल्ली आमदारांचा बेसिक पगार १२ हजारांवरून ५० हजार इतका झाला असून त्यांचे महिन्याचे पॅकेज २ लाख १० हजार रुपये इतके होईल. तसेच मंत्र्यांच्या पगारातही वाढ झाली असून त्यांचा बेसिक पगार आता २० हजारांवरून ८० हजार इतका झाला आहे. यापूर्वी आमदारांना देशांतर्गत दौ-यांसाठी भत्ता दिला जात असे, मात्र या विधेयकानुसार आमदारांना आता परदेश दौ-यांसाठी भत्ता मिळणार आहे. विशेष म्हणजे आमदारांच्या पगारात दरवर्षी १० टक्के वाढ करण्यात येणार आहे.
 
आता आमदारांना टेलिफोन बिल चुकवण्यासाठी दरमाह आठ हजार रुपयांच्या जागेवर 10 हजार रुपये दिले जातील आणि त्यांच्या ऑफिसच्या कर्मचार्‍यासाठी दरमाह 70 हजार रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे.  
 
आमदार आता लग्जरी गाड्यामधून फिरताना दिसणार आहे. पगारात संशोधनानंतर आता आमदारांना कार खरेदीसाठी चार लाख रुपयांच्या जागेवर आता 12 लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे, एवढेच नव्हे तर फिरण्यासाठीपण 50 हजार रुपयांच्या जागेवर तीन लाख रुपये देण्यात येतील, ज्यात प्रवास देखील सामील असेल. दरम्यान भाजपने या वेतनवाढीचा विरोध करत सभात्याग केला.

वेबदुनिया वर वाचा