चंद्रयान मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात

शनिवार, 2 जून 2007 (21:43 IST)
भारताचे चंद्रयान मोहिमेसाठीचे वैज्ञानिक उपकरणं व यान विकासाचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील वर्षी निर्धारित वेळेत चंद्रयान अंतरिक्षात झेवपावणार असल्याचे समजते.

चंद्रयान-1 मोहिमे अंतर्गत चंद्राच्या पृष्ठभागाचे त्रिमितीय छायाचित्र घेण्यासोबतच खनिज व रसायनांचा शोध घेण्यात येणार आहे.

बंगलोर येथे डीप स्पेस नेटवर्क केंद्र स्थापन करण्यात आले असून 2008 पर्यत अंतरिक्ष यान पूर्णपणे तयार होणार असल्याचे सांगीतले. यासंबधित स्थायी समितीने संसदेत अहवाल सादर केला आहे.

वेबदुनिया वर वाचा