घातक रसायनांमुळे सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू

शनिवार, 16 जानेवारी 2016 (10:45 IST)
घातक रसायनांमुळे सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता एफबीआय या अमेरिकेच्या तपास संस्थेने वर्तवली आहे. 

दिल्लीच्या आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) विषबाधा हे मृत्यूचे कारण नमूद केले होते, त्यालाही या अहवालामुळे दुजोरा मिळाला आहे, तथापि विषारी घटक नेमके कोणते याबाबत स्पष्टता नाही.

दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी म्हटले, सुनंदा यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. त्यांच्या व्हिसेरामध्ये किरणोत्सारी पदार्थाचे अस्तित्व आढळून आले नाही. एम्सने विषबाधेचा अहवाल दिला होता. एफबीआयनेही त्याला दुजोरा दिला असल्याचे एम्सच्या न्यायवैज्ञक विभागाचे प्रमुख सुधीर गुप्ता यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा