कपाळात आणि छातीत गोळ्या घुसल्याने डॉ. कलबुर्गी कोसळले. अत्यवस्थ अवस्थेत त्यांना सर्वप्रथम खासगी रुग्णालयात व नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, डॉ. कलबर्गी यांच्यावर यापूर्वी हल्ला झाल्यानंतर त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. मात्र, काहीच दिवसांपूर्वी त्यांच्या विनंतीवरून पोलिस संरक्षण काढण्यात आले होते. त्यानंतर हा हल्ला झाला.