'गुजरात दंगलीवर यापूर्वीच उत्तर दिले आहे'

गुरूवार, 17 एप्रिल 2014 (11:07 IST)
गुजरातमध्ये 2002मध्ये उसळलेल्या दंगलींवर  आपण कधीच मौन धारण केले नव्हते. जेव्हा जेव्हा मला  गुजरात दंगलींसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले त्यावेळी मी त्या  प्रश्नांची उत्तरे दिली असल्याचे स्पष्टीकरण भाजपचे  पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी बुधवारी दिले.

मोदी म्हणाले, मी उत्तर दिले असले तरी दुर्दैवाने कोणीही  माझी बाजू समझून घेण्याचा प्रयत्न केला नाही. याची खंत  वाटते. गुजरात दंगलीविषयी नरेंद्र मोदी कधीच भाष्य करत  नाही असा आरोप नेहमीच केला जातो. मात्र मोदींनी एका  खासगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखातीत हा आरोप फेटाळून  लावला. मी आता जनतेच्या कोर्टात असून तेच खरं काय ते  ठरवतील, असेही मोदींनी सांगितले.

वाराणसी व देशातील अन्य भागांमधील मुस्लिम मतदारांना  मोदींची भिती वाटते. याविषयी प्रश्न विचारला असता मोदी  म्हणतात, मी वाराणसीत कोणाला हरवण्यासाठी जात नसून  लोकांची मने जिंकण्यासाठी जात आहे.

जयललिता व मोदी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु असले तरी  जयललिता व माझे व्यक्तीगत पातळीवर चांगले संबंध आहेत.  आम्ही दोघांनीही एकमेकांवर कठोर शब्दात टीका केली नसून  राजकारणात कोणीही अस्पृश्य नसतो असे सूचक वक्तव्यही  त्यांनी जयललितांविषयी केले आहे. 

वेबदुनिया वर वाचा