गुजरातवासीयांच्या धैर्याने पंतप्रधान प्रभावित

भाषा

सोमवार, 28 जुलै 2008 (18:12 IST)
पंतप्रधान मनमोहन सिंगांनी अहमदाबादमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शहरवासीयांनी दाखवलेल्या धैर्य व समजूतदारपणाचे कौतुक केले असून सामाजिक सद्भाव बिघडवणे व लोकांचे धैर्य खचवण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पंतप्रधानांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदींची भेट घेऊन रूग्णालयास भेट भेटून बॉम्बस्फोटग्रस्तांच्या मदतीसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती घेतली. शनिवारी शहरात झालेल्या स्फोटात 49 बळी पडले होते तर दीडशे जखमी झाले होते.

पंतप्रधानांसोबत कॉंग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी, गृहमंत्री शिवराज पाटील हेही आले आहेत. आपत्तीच्या परिस्थितीत गुजरातवासीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्यासाठी येथे आल्याचे सांगितले. सामाजिक स्वास्थ्य, धार्मिक सद्भाव नष्ट करून व लोकांचे धैर्य खचवण्याचा उद्देश दहशतवादी हल्ल्यांमागे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा