गुजरातमध्ये तरुणी, महिलांनी जीन्स परिधान करू नये!

बुधवार, 20 ऑगस्ट 2014 (17:04 IST)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये तरुणी आणि महिलांनी जीन्स परिधान करू नये, असे आवाहन करण्‍यात आले आहे. मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या आता देशातील महिलांना नैतिकतेचा पाठ शिकवताना दिसत आहेत.

पोरबंदर पोलिसांनी एक पोस्टर जाहीर केले असून तरुणी तसेच महिलांनी जीन्स न परिधान करण्याचे आवाहन केले आहे. 
 
पोलिसांनी जाहीर केलेल्या या पोस्टरमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धक्कादायक म्हणजे, हे पोस्टर महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत तयार करण्यात आले आहे. यामध्ये महिलांनी अंगभर कपडे घालण्याची सूचना करण्यात आली आहे. 

वेबदुनिया वर वाचा