गुजरातमध्येच असहिष्णुतेचे मूळ!

शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 (18:49 IST)
असहिष्णुतेचे मूळगुजरातमध्येच आहे, असे टीकास्त्र सोडत गुजरातमधील लेखक, साहित्यिकांनी ‘पुरस्कार वापसी’मागील भूमिका स्पष्ट केली. असहिष्णुताबाबत लोकभावना समजून घेण्यासाठी गुजरातमधील साहित्यिकांनी ‘दक्षिणायन’मोहिम सुरु केली आहे. यावेळी बोलताना डॉ. गणेश देवी म्हणाले, असहिष्णुतेसंबंधी निर्माण झालेल्या लोकभावना समजून घेण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यांत आम्ही साहित्यिक दौरा करीत आहोत. गुजरात असहिष्णुतेची कार्यशाळा आहे. वेगळा विचार मांडणार्‍या विचारवंतांची हत्या करणे, हे चिंताजनक आहे. गुजरातमध्ये सन २००२नंतर तेथे विविध मागार्ने विचार दडपण्याचे प्रकार वाढत आहेत. 
 

वेबदुनिया वर वाचा