गजानन पेंढारकर यांचे निधन

गुरूवार, 8 ऑक्टोबर 2015 (10:41 IST)
'विको' उद्योग समूहाचे ४४ वर्षे अध्यक्षपद भुषविणार्‍या गजानन पेंढारकर (वय ८२) यांचे निधन झाले. ते प्रदीर्घ काळ आजारी होते. परळमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मराठी उद्योगविश्वातील एक प्रयोगशील उद्योगपती म्हणून त्यांची ओळख होती. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा