खुशखबरी: आता ट्रेनमध्ये तुमचे सामान चोरी होणार नाही, जाणून घ्या कसे

मंगळवार, 18 ऑगस्ट 2015 (11:48 IST)
रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. रेल्वे फारच लवकर त्यांना 12 अशा प्रकारचे कोच देणार आहे, ज्याने तुमचा प्रवास एकदम सुरक्षित आणि आरामाचा ठरेल. पंजाबच्या कपूरथला कोच फॅक्टरीने 50,000व्या कोचच्या स्वरूपात याचा निर्माण केला आहे. फॅक्टरी पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत अशे किमान 200 कोचाचे उत्पन्न करेल. यातून 12 कोच पूर्वोत्तर रेल्वेला मिळण्याची उमेच आहे.  
 
या कोचाची सर्वात मोठे वैशिष्ट्ये अशे आहे की यात सीट नंबर ब्रेल लिपीत लिहिण्यात आले आहे. यामुळे दृष्टिबाधितांना आपली जागा शोधण्यात अडचण येणार नाही. त्याशिवाय कोचाची बॉडीला अग्निरोधी तयार करण्यात आले आहे, ज्याने आगीपासून ही पूर्णपणे सुरक्षित असेल. ट्रेनमध्ये लूटपाटच्या वाढत्या प्रसंगांना थांबवण्यासाठी कोचाचे दोन्ही दारांवर सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात आले आहे. संपूर्ण कोच याच्या कैदी राहील.    
 
दोन्हीकडे उघडतील दार  
इमरजेंसीमध्ये कोचाचा दरवाजा प्रवासी बाहेरून ओढतो पण सिस्टम नसल्यामुळे तो उघडता येत नाही. या कोचामध्ये दाराची फिटिंग अशी करण्यात आली आहे की हे दोन्ही बाजूने उघडतील.  
 
एलईडी अलार्म सिस्टम
या कोचामध्ये एलईडी अलार्म सिस्टम पण लावण्यात आले आहे. स्टेशनवर ट्रेन थांबल्यावर हा अलार्म प्रवाशांना सांगेल की कोणते स्टेशन आले आहे.  
 
हे वैशिष्ट्ये पण काही कमी नाही  
कोचामध्ये अग्निरोधी मेटलचा वापर करण्यात आला आहे  
अत्याधुनिक फ्लोर
वरच्या बर्थवर चढण्यासाठी दोन्हीबाजूने क्लिप
लॅपटाप-मोबाइल चार्जिंग बॅग
एलईडी लाइट
शौचालयामध्ये एक्झॉस्ट फॅन
शौचालयामध्ये स्टेनलस स्टीलचा कमोड 
स्टेनलस स्टीलचा सिंक

वेबदुनिया वर वाचा