कोळसा घोटाळा: मनमोहन यांना समन्स पाठविण्याची मागणी

मंगळवार, 18 ऑगस्ट 2015 (10:01 IST)
नवी दिल्ली- कोळसा घोटाळाप्रकरणी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह तिघांना समन्स पाठवावे, अशी मागणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांनी सीबीआयच्या विशेष न्यायालयात केली.
 
कोडा यांनी तत्कालीन कोळसामंत्री मनमोहनसिंग आणि ऊर्जा मंत्रालयाचे सचिव आनंद स्वरूप तसेच खाण आणि भूगर्भ विभागाचे सचिव जयशंकर तिवारी अशा तिघांना समन्स पाठविण्याची मागणी केली आहे. न्यायालयाने या संदर्भात सीबीआयला त्यांची बाजू मांडण्याची सूचना केली आहे. पुढील सुनावणी आता 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. 
 
उद्योगपती नवीन जिंदाल आणि इतरांविरुद्ध कोळसा घोटाळाप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. जिंदाल यांच्याशिवाय कोडा, माजी कोळसा राज्यमंत्री दासरी नारायणराव, माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता आणि इतर अकरा जणांविरुध्द आरोप ठेवण्यात आले आहेत.

वेबदुनिया वर वाचा