कोर्टाने मागविले कलमाडींचे संसदेतील उपस्थितीचे रेकॉर्ड

शनिवार, 30 जुलै 2011 (14:04 IST)
संसदेत उपस्थि राहण्याची परवानगी मागणार्‍या खा. सुरेश कलमाडी यांच्या संसदेतील उपस्थितीचे रेकॉर्डच न्यायालाने मागविले आहे. राष्ट्रकुल घोटाळ्यातील आरोपी सुरेश कलमाडी सध्या तिहार तुरुंगात आहेत. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्याला 1 ऑगस्टपासून सुरू होणार्‍या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे. त्यावर न्यायालयाने लोकसभेतील त्यांच्या मागील पाच वर्षांच्या उपस्थितीचे रेकॉर्ड मागविले आहे. सीबीआयला या संदर्भात न्यायालयाने नोटीस जारी केली आहे.

वेबदुनिया वर वाचा