कोकणात मुसळधार पाऊस; फोंडा घाटात दरड कोसळली

शुक्रवार, 18 जुलै 2014 (17:27 IST)
कोकणात पावसाचा जोर शुक्रवारी पुन्हा वाढला. पावसामुळे कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला जोडणार्‍या फोंडा घाटात दरड कोसळल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. ढिगारा बाजुला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

फोंडा घाटात आज सकाळी दरड कोसळली. मार्गावरून जाणारी वाहतूक बंद झालीय. घाटात सुमारे 150 मीटर भागात ही दरड कोसळली आहे. रस्त्यावर दगड आणि माती येऊन पडली असल्यामुळे रस्ता पूर्ण बंद झाला आहे. या मार्गावरून जाणारी वाहतूक सध्या गगनबावडामार्गे वळविण्यात आली. या भागात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरुच आहे. 

वेबदुनिया वर वाचा