किंगफिशर कर्मचार्‍याच्या पत्नीची आत्महत्या

वेबदुनिया

गुरूवार, 4 ऑक्टोबर 2012 (19:08 IST)
PR
FILE
किंगफिशर एअरलाइन्सच्या कर्मचार्‍याच्या पत्नीने आर्थिक तंगीने त्रस्त होऊन आत्महत्या केली आहे. या तांत्रिक कर्मचार्‍यास गेल्या सात महिन्यांपासून पगार मिळाला नव्हता.

आत्महत्या करणार्‍या महिलेचे नाव सुष्मिता चक्रवर्ती आहे. पतीस कित्येक महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने आपल्यासमोर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे तिने सोडलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

किंगफिशर आणि सरकारदम्यान गुरूवारी झालेल्या चर्चेतूनही तोडगा निघाला नाही. कंपनीचे मालक विजय माल्या सद्या परदेशात आहे. (वेबदुनिया न्यूज)

वेबदुनिया वर वाचा