कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला

श्रीनगर- जम्मू-कश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उधमपूर जिल्ह्यातील कूड भागात दहशतवाद्यांनी 5 वाजता प्रवासी वाहतूक करणारी बस व सीआरपीएफच्या तळावर गोळीबार केला. यावेळी दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे होती. जवानांनाही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आले असून, तीन जवान जखमी झाले आहेत.

वेबदुनिया वर वाचा