कर्मचार्‍याची अशीही गांधीगिरी

डॉ. भारती सुदामे

गुरूवार, 27 मार्च 2008 (08:56 IST)
पेंन्शन कार्यालयात एक आजोबा आपले सारे कपडे उतरवून लाच मागणार्‍या संबंधीत अधीकार्‍याला देतात आणि त्यांच्या या कृती नंतर त्यांना न्याय मिळतो. हे मुन्नाभाई चित्रपटातील दृश्य बडोद्यातील पीएफ कार्यालयात प्रत्यक्षात घडले. आणि या संबंधीत व्यक्तीला नंतर न्यायही मिळाला.

इंडिकॉम च्यूइंगम नामक कंपनी बंद पडल्याने यात काम करणार्‍या इंद्रवदम रतीलाल पटेल यांच्यावर बेकारीची कुर्‍हाड कोसळली. यानंतर त्यांची आर्थिक परिस्थितीही खालावली, पैशाची गरज भासल्याने त्यांनी पीएफ कार्यालयाशी संपर्क केला असता त्यांना अनेक वेळा परत पाठवण्यात आले.


यानंतर त्यांनी आज पीएफ कार्यालयात जाऊन पुन्हा एकदा अधीकार्‍यांना आपले पीएफचे पैसे देण्याची विनंती केली असता, त्यांना पुन्हा उडवा उडवीची उत्तरे मिळाल्याने त्यांनी अखेर गांधीगिरीचा मार्ग स्वीकारत कार्यालयात आपले कपडे उतविण्यास सुरुवात केली यानंतर संबंधीत अधीकार्‍यांनी त्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान पटेल यांना पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे.

वेबदुनिया वर वाचा