कर्नाटकात भाजपच्या पराभवाची कारणं

बुधवार, 8 मे 2013 (15:09 IST)
FILE
कर्नाटकात फक्त कमळचं मुरझावले असून भाजपातील बड्या नेत्यांचे चेहरेही उतरले आहेत. भ्रष्ट्राचाराच्या मुद्यावरून सपुआ सरकारला घेरणार्‍या भाजपाच्या हातून दक्षिणेतील एकमेव गढही निघून गेला.

राज्यात सत्ताधारी भाजपा फक्त हरलीच नसून नामशेष झाली आहे. सत्ताधारी पक्षाच्या मानहानिकारक पतनामाची कारणं
नेमकी काय आहेत?

भाजपा नेतृत्वाने कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या ताकदीचा अंदाज घेण्यात चुकले. येडीयुरप्पांनी नवीन पक्ष स्थापन करून भाजपास नामशेष करण्यात कसर सोडली नाही. पक्षाचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी येडीयुरप्पांमुळे भाजपास हादरा बसल्याचे निकालानंतर मान्यही केले.

पराभवाचे दुसरे कारण


भाजप सरकार भ्रष्ट्राचाराच्या गंभीर आरोपात घेरल्या गेले व बेल्लारीच्या रेड्डी बंधूंच्या काळ्या कारभाराची किंमत पक्षास अदा करावी लागली. या मुद्यावर सरकार ठोस पावले उचलू शकली नाही परत लोकांचा विश्वास संपादन करणारा नेताही देऊ शकली नाही.

जेडीएसचे चमत्कारिक प्रदर्शन: माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या जेडीएसने अपेक्षेपेक्षा चांगले प्रदर्शन केले. यापूर्वीच्या निवडणूकीत त्यांना फक्त 28 जागा मिळाल्या होत्या. म्हणूनच त्यांना एकही विश्लेषक कमी लेखत नव्हते मात्र, भाजपचे लक्ष फक्त काँग्रेसच्या आक्रमक प्रचारावर राहिली.

भ्रष्ट्राचाराने बुडवले भाजपला..


भाजपने केंद्रात भ्रष्ट्राचाराचा मुद्दा लावून धरला होता, मात्र कर्नाटकात हाच मुद्दा त्यांच्या विरोधात गेला. काँग्रेसने येथे भाजपचा भ्रष्ट्राचार चव्हाट्यावर आणून लोकांमध्ये जागृती निर्माण केली. कोळसा घोटाळ्या फसल्यानंतरही काँग्रेस प्रणीत सपुआ सरकारने हार न मानता भाजपला कर्नाटकात फायदा मिळू दिला नाही. त्यांनी स्टार प्रचारक मोदींची जादूही चालू दिली नाही व आपल्या प्रचारकांचा योग्य वापर केला.

भाजप नेतृत्वाचे लक्ष कर्नाटकापेक्षा दिल्लीत राहिले. त्यांच्यात पंतप्रधानपदाच्या उमेदवारावरच अधिक चर्चा होत राहिली व नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी त्यांनी सर्व ताकद लावली.

वेबदुनिया वर वाचा