कर्नाटकचा फलक उमरग्यात लावण्याचे मनसुबे उधळले

बुधवार, 30 जुलै 2014 (11:22 IST)
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या सीमेत घुसून कर्नाटकचा फलक लावण्याचे कर्नाटक रक्षणा वेदिका संघटनेचे मनसुबे पोलिसांनी उधळले. पोलिसांनी संघटनेच्या नऊ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, वेदिका संघटनेचे कार्यकर्ते महाराष्ट्रात कर्नाटकचा फलक लावणार होते. अशी माहिती पोलिसांना कळाली होती. या पार्श्वभूमीवर बिदर जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली होती. कर्नाटक पोलिसांनी बारा वाहनांना हुमनाबाद, बिदर, भालकी, शहाजनी औराद येथे पकडले. त्यांना महाराष्ट्र सीमेकडे येण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला. मात्र, काही कार्यकर्ते अन्य मार्गाने जीपमधून तलमोडजवळील महाराष्ट्र सीमेवर आले. आधीच सापळा रचून पोलिसांनी नऊ जनांना अटक केली. 

वेबदुनिया वर वाचा