एक अपहृत पर्यटकाची मुक्तता

वेबदुनिया

सोमवार, 26 मार्च 2012 (12:58 IST)
ओडिशातील कंधमालच्या जंगलात माओवाद्यांनी अपहरण केलेल्या दोघा इटालियन पर्यटकांपैकी एकाची काल सुटका करण्यात आली. तब्बल 12 दिवसांच्या बंदीवासानंतर ही सुटका करण्यात आली आहे.

सुटका करण्यात आलेल्या इटलीच्या नागरिकाचे नाव क्लाऊडिओ कोलंजेलो असे आहे. 18 मार्च रोजी कंधमाल भागात फिरत असलेले बोसुस्को पावलो आणि क्लाऊडिओ कोलंजेलो या इटलीच्या नागरिकांनचे माओवाद्यांनी अपहरण केले होते.

वेबदुनिया वर वाचा