उष्णतेच लाटेचा आंध्र, तेलंगणात कहर

शनिवार, 23 मे 2015 (12:37 IST)
तेलंगणा व आंध्र प्रदेशच बहुतांश भागात उष्णतेच लाटेचा कहर असून आतार्पत 43 जणांचा या लाटेत बळी गेला आहे.
 
महसूल सचिव बी.आर. मीना यांनी सांगितले की, गुरुवारपर्यंत मिळालेल माहितीनुसार तेलंगणात 21 जणांचा बळी गेला आहे. आंध्र प्रदेशात 22 जण मृतुमुखी पडल्याचे सांगणत आले. तेलंगणा सरकारने नागरिकांसाठी उन्हापासून बचाव करण्यासाठी काय करावे अन् काय करू नये, याची माहिती देणारे पत्रकच प्रसिध्द केले आहे. दिवसा तपमान जास्त असेल तेव्हा घराबाहेर पडू नका, असा सल्ला देण्यात   आला आहे.
 
नालगोंडा, निझामाबाद आणि करीमनगर या जिल्हय़ांना उन्हाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. रविवारपर्यंत दिवसाचे तपमान वाढण्याची  शक्यता हैदराबाद येथील हवामान खात्याचे संचालक वा. के. रेड्डी यांनी व्यक्त केली आहे. खम्माम येथे 47 डिग्री सेल्सिअस तपमानाची नोंद झाली आहे. पूर्व गोदावरी जिल्हय़ात गेल तीन दिवसांमध्ये आठजण मृतुमुखी पडले आहेत. राजहमुंद्री व पूर्व गोदावरी जिल्हय़ात 42 ते 45 डिग्री तपमानाची नोंद झाली आहे.

वेबदुनिया वर वाचा