उत्तराखंडमध्ये ढगफुटी सहा लोकांचा मृत्यू

गुरूवार, 31 जुलै 2014 (12:19 IST)
उत्तराखंडमधील तेहरी जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या ढगफुटीमुळे सहा लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे गुजरात आणि आसाममध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत.
 
उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तेहरी जिल्ह्यातील नौटर गावाजवळ ढगफुटी आहे. यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाचे चार जण बळी गेले आहेत. काही जण वाहून गेल्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. बचावकार्य सुरू आहे. रुद्रप्रयाग ते तेहरी रस्ता बंद करण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये येत्या 24 तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 
 
दुसरीकडे, गुजरातमध्ये पावसाने थैमान घातले आहे. राज्याच्या अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे. नडियादमध्ये एका पुलाखाली बस अडकून पडल्याने  प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली होती. 

वेबदुनिया वर वाचा