इसिसचा प्रचार; संकेतस्थळ ब्लॉक

शुक्रवार, 29 एप्रिल 2016 (11:01 IST)
इसिसच्या विचारांचा प्रचार करीत असल्याबद्दल एटीएसने  संकेतस्थळ ब्लॉक केले आहे. नाऊरू या छोट्या बेटासारख्या देशातील संकेतस्थळ एटीएसने ब्लॉक केले आहे.  एटीएसने आणखी तीन संकेतस्थळे ब्लॉक केली आहेत. त्यात आॅस्ट्रेलियन इस्लामी उपदेशक मुसा सेरॅनतोनिओची (३०) प्रवचने प्रसिद्ध केलेले आणि दुसरे ‘अल कायदा’च्या विचारसरणीचा प्रचार करणाऱ्या संकेतस्थळांचा समावेश आहे.

इसिसमध्ये भारतीय तरुणांनी सहभागी होण्यासाठी या संकेतस्थळाने प्रचार करून प्रभाव निर्माण केला म्हणून आम्ही ते बंद केले. भारतातून काही लोक तिकडे गेल्यामुळे आम्ही ते ब्लॉक केले असे एटीएसच्या अधिकाऱ्याने सांगितले.

वेबदुनिया वर वाचा